अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर प्रेस क्लब व सिटी केअर रुबी हॉस्पिटलतर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त पांजरपोळ येथे आयोजित हुरडा पार्टी कार्यक्रमात पत्रकारांच्या कुटुंबीयांनी रानमेव्यासह हास्यमेव्याचा आनंद लुटला. बाळगोपाळांनी विविध खेळ खेळून धमाल केली. तर रंगलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात हास्यकलाकार देवीप्रसाद (योगेश) सोहोनी यांनी आता कशाला उद्याची वाट? विनोदमय कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना मनमुराद हसविले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रेस क्लबचे अध्यक्ष हाजी मन्सूर शेख, सिटी केअरचे डॉ.संदीप सुराणा, डॉ.गुरमितसिंग, डॉ.वाघमारे, डॉ.हेमा सुराणा, डॉ.सौरभ भुतडा आदिंसह पत्रकार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.सुराणा यांनी त्यांना वडिलांकडून पत्रकार कुटुंबाचा मिळालेला वारसा व शहरात सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणारी अत्याधुनिक रुग्णसेवेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. हास्यकलाकार देवीप्रसाद सोहोनी यांची ओळख योगिनी सोहोनी यांनी करुन दिली.
काळ्या ढगातून बरसण्यासाठी आतुरलेल्या पावसाला विविध कारणे सांगून त्याला हाकलून लावणारी शहरी माणसे. पाऊस पडण्यासाठी आतुरलेला असताना मुंबई, पुणे, नगर व विदर्भ अशी वाटचाल करत तेथील मनुष्य स्वभावाची वैशिष्टये, तेथील भाषा, भौगोलिक परिस्थिती व समस्याचे दर्शन आता कशाला उद्याची वाट? या एकपात्री प्रयोगातून आपल्या अभिनयाद्वारे सोहोनी यांनी हुबेहुब साकारले.
पावसाला घरात न घेणारे पुणेकर, गमतीशीर पुणेरी पाट्या, कंबरडे मोडणारे ऐतिहासिक नगरचे खड्डे आणि नगरी माणूस असे अनेक गोष्टींनी हा हास्य प्रयोग रंगला होता. नाराज होवून पावसाने केलेला संप, मनुष्य कासावीस होवून पावसाला न्यायलयात खेचलेला प्रसंग त्यांनी जीवंत करताच हशा पिकली. पाऊस खेड्यात पोहचतो तेंव्हा तेथील दुष्काळाच्या मनाला भिडणार्या वेदणांची जाणीव करुन, त्यांनी पाऊसाचे महत्त्व सांगत, वृक्षरोपण व संवर्धनाचा संदेश दिला. एक तास रंगलेल्या प्रयोगाद्वारे सोहोनी यांनी ह्रद्यस्पर्शी पाण्याच्या गंभीर प्रश्न हसत खेळत प्रेक्षकांसमोर मांडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश देशपांडे महाराज यांनी केले. उपस्थितांचे आभार विजयसिंह होलम यांनी मानले.

Post a Comment