
अहमदनगर प्रेस क्लब आणि थोर समाजसेवक हाजी अजिजभाई चष्मावाला प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे विविध पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रेस क्लबचे प्र.अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली. दरवर्षी नगरमधील नऊ पत्रकारांना प्रेस क्लबतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कार निवड समितीने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व ५ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक समीर दाणी यांच्यासह सुदाम देशमुख (लोकमत), सूर्यकांत वरकड (सकाळ), अरुण नवथर (दिव्य मराठी), सुनील चोभे (नगर सह्याद्री), केदार भोपे (पुढारी), यांना जाहीर करण्यात आले आहेत. शोधपत्रकारिता पुरस्कार सागर शिंदे (सार्वमत)यांना, वृत्त छायाचित्रकार पुरस्कार राजू खरपुडे यांना तर इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष पुरस्कार सागर दुस्सल यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३0 वा. तुषार गार्डन, हॉटेल संकेत, टिळकरोड येथे होणार आहे. यावेळी उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शकूर शेख व प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले आहे.
Post a Comment