अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक छायाचित्रकार दिना निमित्त शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकारांचा प्रेस क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मिनाताई मुनोत, जिल्हामाहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ट छायाचित्रकार शेवंतराव गोर व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी छायाचित्र कलेत बदलत असलेले तंत्रज्ञान व त्याचे वाढत असलेले महत्त्व विशद केले. पाहुण्यांचे स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, मोबाईल व डिजीटल तंत्रज्ञानाच्या रुपाने प्रत्येकाकडे कॅमेरा आला ते चांगले झाले. त्यामुळे चांगला छायाचित्रकार कोण? याची कल्पना येऊ लागली आहे. प्रेस क्लबच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व पुढीलवर्षी छायाचित्रकारांसाठी स्पर्धा व प्रदर्शनाकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राजेंद्र सरग यांनी मोबाईलच्या रुपाने प्रत्येकाच्या हातात जरी कॅमेरा आला असला तरी, काढलेला फोटो वृत्तपत्रात छापला जाईलच असे नाही. उत्तम छायाचित्रासाठी त्यामागील व्यक्तीची समज व दृष्टी असावी लागते. पत्रकारितेच्या वाटचालीत छायाचित्रांचे स्थान अढळ असल्याचे त्यांनी सांगितले. मिनाताई मुनोत यांनी जागतिक छायाचित्रकार दिना निमित्त छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित वृत्तछायाचित्रकार राजू शेख, दत्ता इंगळे, अनिल शहा, देवीप्रसाद अय्यंगार, जितेंद्र अग्रवाल, महेश कांबळे, समीर मन्यार, मंदार साबळे, लहू दळवी, वाजिद शेख, सुरेश मैड, बबलू शेख, राजू खरपुडे, श्रीकांत वंगारी, साजिद शेख, उद्य जोशी, धनेश कटारिया, सचिन शिंदे, सचिन जगताप यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुशील थोरात, सचिन कलमदाने, प्रमोद गांधी, अमिर सय्यद, शब्बीर सय्यद, शाहिद शेख आदिंसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश देशपांडे महाराज यांनी केले. उपस्थितांचे आभार दत्ता इंगळे यांनी मानले.

Post a Comment