प्रेस क्लबचा ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजानची साधना आपल्याला संयमाची शिकवण देते. रोजाद्वारे आपल्या पंचद्रीयांवर विजय मिळवून, मनुष्य आपल्यातील विकार संपवत असतो. इस्लाम धर्माचे मुलतत्वे अंगीकारुन ईदच्या माध्यमातून समाजाला बंधूभाव, एकता व सदाचाराचे संस्कार मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
अहमदनगर शहर प्रेस क्लबच्या वतीने रमजान ईद निमित्त आयोजित ईद मिलनच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी वामन कदम, तहसिलदार सुधीर पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी आदिंसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की, विकास साधत असताना धर्माच्या मुल्यांची आवश्यकता आहे. प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम दिशादर्शी असून, धार्मिक सलोखा वृध्दींगत होण्यासाठी घेण्यात आलेला ईद मिलनचा कार्यक्रम कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीकोनातून प्रेस क्लब संवेदनशील आहे. सकारात्मक पत्रकारितेद्वारे योग्य गोष्टींवर प्रकाशझोत टाकला जात आहे. प्रेस क्लब राबवत असलेल्या कार्यक्रमामुळे सर्व समाजाप्रती असलेली प्रेम भावना व्यक्त होत असल्याचे सांगून, त्यांनी जिल्हावासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी प्रेस क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले. ईद मिलनच्या कार्यक्रमास कोतवालीचे पो.नि. सोमनाथ मालकर, तोफखान्याचे पो.नि. राजेंद्र निकाळजे, शहर वाहतूक शाखेचे पो.नि. अजय लकडे, सहा.पो.नि. प्रशांत मंडले, विनोद चव्हाण, राहुल पवार बॉम्ब शोधक पथकाचे बजरंग चौघुले यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटना, राजकिय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक, शासकिय अधिकारी यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश महाराज देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सागर शिंदे यांनी मानले.

Post a Comment